गाडीच्या टायर मध्ये नायट्रोजन भरावा का?

गाडीच्या टायर मध्ये नायट्रोजन भरावा का?

आपल्या आजूबाजूला बघितल्यास पेट्रोल पंपावर किंवा इतरही ठिकाणी गाडीच्या टायर मध्ये नायट्रोजन भरताना सर्रासपणे दिसून येते परंतु नायट्रोजन गाडीच्या टायर मध्ये भरणे योग्य की अयोग्य यावर हा लेख.

नायट्रोजन हा सर्वात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला वायू आहे त्याचे हवेतील प्रमाण 78% आहे.
हा वायू थंड असतो तसेच ज्वलनशील नाही.
नायट्रोजन भरलेल्या टायरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे टायरच प्रेशर कमी होत नाही आणि टायर थंड सुद्धा राहतात कारण मुळातच नायट्रोजनचे रेणू (molecules) हे आकाराने मोठे असतात त्यामुळे नियमित हवेपेक्षा त्यांची हालचाल कमी वेगाने होते म्हणून टायर मधील हवा ज्या वेगाने बाहेर पडते त्याच्या तुलनेत नायट्रोजन कमी वेगाने बाहेर पडतो थोडक्यात टायर प्रेशर नियमित राखतो.
नायट्रोजन टायरचे आरोग्य राखण्यास तसेच त्यांना सुस्थितीत ठेवण्यात मदत करते परंतु जशी हवा आपल्याला नाममात्र दरात उपलब्ध होते त्याच्या तुलनेत नायट्रोजन भरण्यासाठी आपल्याला अधिकचे पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे ग्राहकांचा नायट्रोजन भरण्याकडे कमी कल दिसून येतो.

नायट्रोजन थंड असल्याने लांबचा पल्ला गाठताना गाड्यांचे टायर तुलनेत कमी गरम होतात.
हवेच्या तुलनेत याची गळती कमी आहे परिणामी टायर आणि गाड्या लवकर खराब होत नाही.

सामान्यपणे हवा भरलेल्या टायरचा दाब तापमानानुसार कमी जास्त होत राहतो परंतु नायट्रोजन भरलेल्या टायर मध्ये तेवढी तफावत जाणवत नाही.

नायट्रोजन भरतांना कोणती काळजी घ्यावी
कोणत्याही गाड्यांच्या टायर्समध्ये नायट्रोजन भरण्यापूर्वी त्या गाड्यांच्या टायर मधील हवा पूर्णपणे काढली गेलेली असावी.
नायट्रोजन ची किंमत एका टायर साठी सुमारे 25ते 30 रुपये आहे जे महिन्यातून एकदा किंवा दोनदा भरण्याची आवश्यकता असते. 
काही पेट्रोल पंपा वरती नायट्रोजन आपल्याला मोफत सुद्धा भरून दिल्या जातो.
नायट्रोजन उपलब्ध न झाल्यास आपण टायर मध्ये नियमित भरण्यात येणारी हवासुद्धा भरू शकतो.
 

Comments